www.24taas.com, पुणे
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवडमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झालाय. हा स्फोट डांगे चौकातल्या मार्केटसमोर झाला. मात्र स्फोटाच्या कारणाचा उलगडा अजून झालेला नाही. या स्फोटात लहान मुलगा जखमी झाला असून घटनास्थळी बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल झाले आहे.
या स्फोटात 5 वर्षांच्या जखमी झालेल्या मुलाचे नाव पियुष संतोष वाळूंज असल्याचे समजते. डांगे चौकातील मार्केटच्या पायऱ्यांवर हा स्फोट झाला. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असलेल्या वस्तूंचा स्फोट झाला. स्फोटानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
स्फोटाची तीव्रता कमी असली, तरी पिंपरी परिसरात यामुळे घबराट पसरली आहे. असं एक प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. पुण्यामध्य़े 2 ऑगस्ट रोजी झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. पुण्यातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिल आहे.