www.24taas.com, झी मीडिया,पुणे
दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
कातिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही ठिकाणं उडवून देण्याची इंडियन मुजाहिद्दीनची योजना होती. याखेरीज वांद्रे, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी आणि जोगेश्वरी या पश्चिम रेल्वेवरील स्थानकांचीही रेकी करण्यात आली होती.
पुण्यात जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी स्फोटांचं आरोपपत्र एटीएसनं दाखल केलेल्या 3 हजार ८५७ पानी आरोपपत्रांतून ही बाब स्पष्ट झालीये. इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकल यानं येरवडा जेल आणि पुणे कोर्ट उडवून देण्याचे आदेश दिल्याचं या चार्जशिटमध्ये म्हटलंय.
मात्र ही योजना लगेच कार्यान्वित होणं शक्य नसल्यामुळेच जंगली महाराज रोडचं टार्गेट निवडण्यात आल्याचं एटीएसनं म्हटलंय.