www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कास पठार म्हटलं की डोळयासमोर येतात ती वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलं. ही फुलं इतर पठरावरही पाहायला मिळतात असं सांगीतलं तर तुमचा विश्वास बसेल का ? मात्र कोल्हापूरच्या राधानगरी अभायारण्यात आणखी एक नैसर्गिक कासपठार अवतरलंय...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारं राधानगरी अभायारण्य...जैवविवीधतेनं समृद्ध असणारं हे अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे... मात्र इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कासपठाराप्रमाणं इथंही विविध रंगांची गवतफुलं फुलतात. राधानगरीपासुन अदमासे आकरा किलोमीटर अंतरावर हे पठार आहे.
घनदाट झाडी... खडकाळ आणि चिखलाने भरलेला रस्ता....पाण्याचे प्रवाह यातून मार्ग काढतचं इथं पोहोचावं लागतं. राधानगरीच्या या इदरगंज पठारावर पश्चिम घाटातील अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. यातील अनेक वनस्पती तर औषधी देखील आहेत..काही वनस्पती तर इतक्या दुर्मीळ आहेत की त्यांसा समावेश रेड डाटा बुकमध्ये करण्यात आलाय... पांढऱ्या आणि निळ्या रंगाची गेंदी, जांभळ्या रंगाची सीतेची आसवं, गुलाबी रंगाचा तेरड्याचा सडया अशी अनेक फुलं पाहुन डोळ्यांच पारणं फिटतं... त्यामुळे वेडावून टाकणा-या या निसर्गसौंदर्याचा अस्वाद घेण्यासाठी एकदातरी या प्रतिकास पठाराला आवश्य भेट द्या...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.