www.24taas.com, मुंबई
सामग्री -
१ वाटी तांदूळ, १ वाटी खिसलेला गूळ, १ चमचा तूप, खसखस, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती –
तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलत राहावे. चौथ्या दिवशी तांदूळ चाळणीत नितळत ठेवावे. मिक्सर मध्ये तांदूळ बारिक वाटून घ्या आणि त्यानंतर बारिक चाळणीने चाळून घ्या. खिसलेला गूळ आणि एक चमचा तूप चाळलेल्या तांदूळात घालून मळून घ्या. मळून ठेवलेला तांदूळाचे गोळा ५ ते ६ दिवस डब्ब्यात भरून ठेवा. स्टीलचा डब्बा शक्यतो वापरू नये.
५ ते ६ दिवसांनी पिठ बाहेर काढावे . तळण्यासाठी तेल मंद आचेवर गरम करत ठेवावे. २ ते ३ सुपारी एवढे गोळे तयार करून पुरीप्रमाणे लाटावेत. पोळपाटावर खसखस ठेवून अनारसे लाटून घ्यावेत. अनारसे तळताना खसखसचा भाग वरच्या बाजूला ठेवून तळावेत म्हणजे खसखस जळणार नाहि. काहीवेळा अनारसे तळताना फसफसतात तेव्हा विशेष काळजी घ्यावी. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यत अनारसे तळावेत. टिप – अनारसांचे पिठ ५ ते ६ महिन्यांपर्यत टिकते.