क्रिकेटच्या इतिहासातील जादुई कारनामा : १४ चेंडू, ६ विकेट आणि एकही रन नाही

क्रिकेटच्या जगात विक्रमांची कमी नाही, क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह काही क्लब लेव्हलवर विचित्र रेकॉर्ड होत असतात. 

Updated: Apr 11, 2016, 06:46 PM IST
क्रिकेटच्या इतिहासातील जादुई कारनामा : १४ चेंडू, ६ विकेट आणि एकही रन नाही title=

कोलकता : क्रिकेटच्या जगात विक्रमांची कमी नाही, क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह काही क्लब लेव्हलवर विचित्र रेकॉर्ड होत असतात. 

पश्चिम बंगालचा क्रिकेटर रितिक चटर्जी याने असा शानदार कामगिरी केली आहे. शनिवारी बंगाल क्रिकेट संघाच्या पहिल्या डिव्हिजनच्या दोन दिवसाच्या प्ले ऑफ मॅचमध्ये भवानीपूर क्लबने मोहम्मडन स्पोर्टिंगवर २५३ धावांनी विजय मिळविला. 

या सामन्यात बंगालचा ऑफ स्पिनर रितिक चॅटर्जी याने एकही रन न देता सहा विकेट घेतल्या. यासाठी त्याने केवळ १४ चेंडू टाकलेत. विशेष म्हणजे त्याच्या १४ चेंडूत एकही धाव घेण्यात आली नाही किंवा त्याने अतिरिक्त म्हणून एकही धाव दिली नाही. 

या प्रकारचा विक्रम कोणत्याही क्रिकेट सामन्यात खूप कमी होतो.

 

चटर्जीने आपल्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. तर तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर १० वी विकेट घेतली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

मोहम्मडन स्पोर्टिंग टीम १३.२ ओव्हरमध्ये ३७ धावांवर गारद झाली.