मुंबई : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आपल्याला क्रिकेट जरी आवडत असलं तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही. आज आम्ही तुम्हाला 5 असे रेकॉर्ड सांगणार आहोत जे कदाचित भविष्यात कधीच मोडले जाणार नाहीत.
हे 5 रेकॉर्ड कधी मोडले जाणार नाही :
१) १० रन्स १० विकेट : यॉकशायरचा डावखूरा स्पिनर हेडलीच्या नावावर १० रन्स देऊन १० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे. ३७८ फर्स्ट क्लास सामने खेळणाऱ्या हेडलीने एकूण १९५६ विकेट्स घेतले आहेत. १९३२ ला नॉटींग हॅम संघाचा स्कोर नाबाद ४४ होता. पण हेडलीने जेव्हा चेंडू हातात घेतला तेव्हा ६७ रन्समध्ये सर्व संघ तंबूत परतला. १० रन्स मध्ये देत त्यांनी १० विकेट्स घेतल्या.
२) ८५१ रन्सने पराभव : फर्स्ट क्लास सामन्यातील कदाचित सर्वात मोठा पराभव आयूब ट्रॉफीसाठी झाला. डेरा इस्माइल संघाविरुध्द पाकिस्तानने ९१० रन्स ठोकले. डेरा इस्माइल संघाने पहिल्या डावात फक्त ३२ तर दुसऱ्या डावात २७ रन केले. पाकिस्तान रेल्वेने हा सामना ८५१ रन्सने जिंकला.
३) कसोटी मालिकेत ९७४ रन्स : ऍशेस मालिकेसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये एका मालिकेत सर डॉन ब्रॅडमननी तब्बल ९७४ धावा ठोकल्या होत्या. त्यापैकी हेडींग्लेच्या सामन्यात पहिल्याच दिवशी डॉननी एकट्याने ३०९ धावांचा पाऊस पाडला होता.
४) मुरलीधरनच्या १३४७ विकेटस : वयाच्या विसाव्या वर्षी जेंव्हा श्रीलंकेकडून मुरलीने पहिला बॉल टाकला तेंव्हा ब-याच जणांना त्याच्या विचित्र बॉलीग स्टाईलचे कुतूहल वाटले. काहींनी टीकाही केली. परंतू दोन दशकानंतर जेंव्हा तो रिटायर झाला तेंव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट्स, वन डे मध्ये ५३४ विकेट्स घेणारा मुरली एकमेव बॉलर ठरला. २०/२० मध्ये सुध्दा १३ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
५) १९ विकेट्स : अनिल कुंबळेने १९९९ ला एका डावात पाकिस्तानच्या १० विकेटस चटकावल्या होत्या हे आपणांला माहित आहेच. त्या आधी तो विक्रम इंग्लडच्या जिम लेकरच्या नांवावर होता. सन १९५६ ला ऑस्ट्रेलिया विरुध्द जिमने तो विक्रम केला होता. पण महत्वाचे म्हणजे त्या कसोटीत जिमने ऑस्ट्रेलियाच्या २० पैकी १९ विकेटस एकटयानेच घेतल्या. इतर बॉलर्सनी तब्बल १२३ ओव्हर्स टाकल्या, परंतु फक्त एकच गडी ते बाद करु शकले. जिमने 90 धावा देऊन 19 विकेट्स घेतल्या होत्या.