नागपूर : अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सहा वेळा पाच विकेट घेण्याची किमया अश्विनने करून दाखवली आहे. त्याने अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे.
हरभजन अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होता. त्याने २००१मध्ये १२ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे याने २००४ मध्ये ही कामगिरी केली होती. त्याने एका इनिंगमध्ये ८ विकेट घ्याची कामगिरी केली होती. तर एका मॅचमध्ये १३ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. यासाठी त्याने १२ मॅच खेळल्या होत्या.
अश्विनची ही कामगिरी सर्वार्थाने उत्कृष्ट मानली पाहिजे. त्याने ही कामगिरी केवळ ८ सामन्यात करून दाखवली आहे. त्याने बेस्ट कामगिरी ६६ धावा देऊन सात विकेट घेतल्या आहेत.
अश्विनने १५ वेळा पाच विकेट घेतल्या आहे. ही कामगिरी त्याने भारतातील १८ टेस्टमध्ये केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.