कोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय

विराट कोहलीच्या धमाकेदार सेंच्युरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं पुण्याचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. 

Updated: May 7, 2016, 09:06 PM IST
कोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय title=

बैंगलोर: विराट कोहलीच्या धमाकेदार सेंच्युरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं पुण्याचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. 192 रनचा पाठलाग करताना विराट कोहलीनं 58 बॉलमध्ये नाबाद 108 रन केल्या. कोहलीच्या या खेळीमध्ये सात सिक्स आणि आठ फोरचा समावेश होता. यंदाच्या आयपीएलमधली कोहलीची ही दुसरी सेंच्युरी आहे.  

कोहलीबरोबरच के.एल.राहुलनं 38 तर शेन वॉटसननं अवघ्या 13 बॉलमध्ये 36 रन करून बैंगलोरचा विजय सोपा केला.

या मॅचमध्ये टॉस जिंकून बैंगलोरनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पुण्यानं आपल्या 20 ओव्हरमध्ये 191 रन बनवल्या. या मॅचमध्येही अजिंक्य रहाणेनं हाफ सेंच्युरी झळकावली. अजिंक्यनं 48 बॉलमध्ये 74 रन केल्या, तर सौरभ तिवारीनं 52 रन केल्या. 

या पराभवामुळे पुण्याच्या नॉक आऊट स्टेजला जायची शक्यता धूसर झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये 10 मॅचनंतर पुण्याकडे फक्त सहा पॉईंट्स आहेत. 

त्यामुळे नॉक आऊटमध्ये क्वालिफाय करायचं असेल तर पुण्याला त्यांच्या उरलेल्या सगळ्या म्हणजेच चारही मॅच जिंकाव्या तर लागतीलच, पण नेट रन रेट आणि इतर टीमच्या कामगिरीवरही पुण्याचं भविष्य अवलंबून असेल.