चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला

Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय. 

पुजा पवार | Updated: Jan 21, 2025, 12:52 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 :  19  फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. मात्र स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम इंडियावर (Team India) एक नवा आरोप लावला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार नसल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी यापूर्वीच हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवली जाणार हे निश्चित आहे. मात्र आता बीसीसीआय टीम इंडियाच्या जर्सीवर स्पर्धेचे यजमानपद असणाऱ्या पाकिस्तानचं नाव सुद्धा लिहिणार नाही. यानिर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयवर आरोप लावले की ते क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानच नाव प्रिंट न करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीची नाराजी ही फक्त जर्सीवर नाव न लिहिण्यावरून नाही तर बीसीसीआयने स्पर्धेच्या सुरुवातीला कॅप्टन मीटसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माल पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने देखील आहे, इत्यादी सर्व कारणांमुळे पीसीबीचे अधिकारी बीसीसीआयवर नाराज आहेत. 

हेही वाचा :  भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

 

PCB याविषयी आयसीसीशी बोलणार : 

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत असून हे खेळासाठी ठीक नाही. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. ओपनिंग सेरेमनीसाठी ते त्यांचा कर्णधारही पाकिस्तानला पाठवणार नाहीत आणि आता ते त्यांच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव देखील छापणार नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसी हे होऊ देणार नाही आणि या प्रकरणात पाकिस्तानला पाठिंबा देईल".

टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने कधी? 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा