Shivani And Ambar Wedding : 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार हिचा विवाह अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी झाला आहे. मंगळवार 21 जानेवारी रोजी ही गोड जोडी लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर त्यांच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
अभिनेत्री शिवानी आणि अभिनेता अंबर यांच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती. हळद, मेहेंदी, संगीत अशा अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शिवानी आणि अंबर हे त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत होते. शिवानी आणि अंबरचा लग्न सोहळा हा पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने पार पडला. नवरी शिवानीने यावेळी नऊवारी साडी, त्यावर लाल रंगाचा शेला, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर अंबरच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावरून या दोघांच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसमोर येत आहेत.
अभिनेत्री शिवानी आणि अंबर यांचा साखरपुडा मागीलवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला होता. राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे शिवानी घराघरांत पोहोचली तर यानंतर ती अभिनेता सुबोध भावे सोबत ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत मुख्य भूमिकेत देखील झळकली. काही दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने शिवानी आणि अंबरचे खास केळवण केले होते. संगीत सोहोळ्यात देखील या जोडीने दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला.