मुंबई : एकाच वर्षामध्ये दोनवेळा आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्येच ही मिनी आयपीएल होईल, अशीही माहिती मिळत आहे. पण ही मिनी आयपीएल देशाबाहेर खेळवली जाऊ शकते.
2014 मध्ये चॅम्पियन्स लीग बंद झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये अशीच एखादी सीरिज खेळवण्यासाठी बीसीसीआय इच्छुक होती, पण बीसीसीआयमधले अंतर्गत वाद, कायदेशीर अडचणींमुळे हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता.
देशाबाहेरच्या भारतीय क्रिकेट रसिकांसाठी विशेषत: अमेरिकेतल्या भारतीयांची संख्या आणि तिथलं मार्केट लक्षात घेऊन बीसीसीआयचे हे मिनी आयपीएल भरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.