जोहान्सबर्ग: ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
कोणत्याही खेळाडूचं व्हॅल्यूबल असणं म्हणजे त्याची कमाई असते. म्हणजे दरवर्षी त्याला फी, बक्षीस यावरून त्याची किती कमाई आण व्हॅल्यू माहिती होते. फोर्ब्स मासिकानुसार २०१३मध्ये फेडरर आणि टायगर वुड्स दोघांची ४ कोटी ६० लाख डॉलर इतकी कमाई झालीय. ते दोघं पहिल्या नंबरवर आहेत. तर धोनीनं २ कोटी १० लाख डॉलर (जवळपास १२६ कोटी रुपयांची) २०१३ या वर्षात कमाई केलीय आणि तो पाचव्या नंबरवर आहे. त्याच्या आधी म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे टेनिस स्टार मारिया शारापोव्हा जिनं २ कोटी ३० लाख डॉलर कमावलेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे बास्केटबॉल खेळाडू लीब्रॉन जेम्स ज्यानं २ कोटी ७० लाख रुपयांची कमाई केलीय. तिसऱ्या नंबरवर फिल मिकेलसन त्याची कमाई अडीच कोटी डॉलर तर नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर फुटबॉल खेळाडू रोनाल्डो आणि मेसी (अनुक्रमे) आहेत. मेसीनं १ कोटी ३० लाख डॉलरची कमाई केलीय.
फेडरर खूपच महागडा खेळाडू आणि आहे तो मोठ्या टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी गॅरंटीच्या रुपातच कमीतकमी १० लाख डॉलर (सहाशे कोटी रुपये) घेतो. त्याचं स्पोर्ट्सचं सामान बनवणारी कंपनी नाइकी सोबत त्याचा १० कोटी डॉलरचा करार आहे. ही रक्कम त्याला १० वर्षात मिळेल.
The top 10 most valuable athletes according to Forbes are:
1. Roger Federer (Tennis) and Tiger Woods (Golf): 46 million dollars each
2. LeBron James (Basketball): 27 million dollars
3. Phil Mickelson (Golf): 25 million dollars
4. Maria Sharapova (Tennis): 23 million dollars
5. Mahendra Singh Dhoni (Cricket): 21 million dollars
6. Usain Bolt (Track and Field): 20 million dollars
7. Kobe Bryant (Basketball): 19 million dollars
8. Li Na (Tennis): 15 million dollars
9. Cristiano Ronaldo (Football): 13 million dollars
10. Lionel Messi (Football): 13 million dollars
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.