नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (बीसीसीआय)ने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन लीनमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
मोहित शर्मा जखमी झाल्यामुळे ईशांत शर्माला १५ सदस्यीय टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन रवीचंद्रन अश्विनला पहिल्या तीन वनडेमध्येही स्थान देण्यात आले नाही. त्यावेळी त्याला विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
धर्मशाला येथे १७ ऑक्टोबरला आमि कोलकता येथे २० ऑक्टोबरला चौथी आणि पाचवी वन डे खेळवण्यात येणार आहे. टीममध्ये मोठे बदल करण्यात आले नाही. पण २२ ऑक्टोबरला होणाऱ्या टी-२० साठी संजू सॅमसंग, मनीष पांडे आणि कर्ण शर्मासह काही नव्या १४ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.
अक्षर आणि पांडेला टी-२० संघात धवल कुलकर्णी आणि अंबाती रायडूच्या जागेवर घेण्यात आले आहे. अक्षरने या वर्षी जूनमध्ये बांग्लादेश दौऱ्या तीन वन डे मॅच खेळल्या होत्या. त्यात केवळ एक विकेट मिळाली होती. पण चॅम्पियन्स लीगमध्ये त्याचे प्रदर्शन चांगले होते.
शेवटच्या दोन वन डे आणि टी -२० सामन्याचा संघ पुढील प्रमाणे –
वनडे टीम:- महेंद्र सिंह धोनी (कप्तान), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडु, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल
टी20 टीम:- महेंद्र सिंह धोनी (कप्तान), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, संजू सॅमसन, मनीष पांडे आणि उमेश यादव.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.