ऑकलँड : सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमचा चांगलाच बोलबाला होत आहे. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची कर्णधार म्हणूनही चांगलीच प्रशंसा होत आहे. परंतु, वर्ल्डकपमधील कर्णधार म्हणून "माझ्या उत्कृष्ट कामगिरीच श्रेय मी बॉलर्सला देतो" असं मत धोनीने व्यक्त केलं आहे.
जेव्हा बॉलर्स प्लानिंग केल्याप्रमाणे चांगली कामगिरी करतात तेव्हा कर्णधाराच काम सोपं होतं आणि जोपर्यंत ठरल्याप्रमाणे काही होत नाही, तोपर्यंत कर्णधाराची कामगिरी चांगली होऊ शकत नाही, असंही धोनीने सांगितलं.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप आणि २०११ साली वनडे वर्ल्डकप जिंकले आहेत. भारतीय टीमची कामगिरी अशीच राहिल्यास हा वर्ल्डकपवर सुद्धा भारताचे नाव कोरले जाऊ शकते. तसा आत्मविश्वासही रवी शास्त्रींनीही व्यक्त केला आहे.