केंटरबरी (न्यूझीलंड) : 'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?
होय, चक्क एका रोबोटनं आपल्या अंदाजात वर्ल्डकप २०१५ च्या विजेत्या टीमचं नाव जाहीर केलंय. वर्ल्डकपची विजेती टीम म्हणून अफगाणिस्तानच्या टीमला या रोबोटनं निवडलंय... महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अफगाणिस्तानची टीम वर्ल्डकपच्या युद्धात यंदा पहिल्यांदाच उतरणार आहे.
सट्टेबाजी जगतातही अफगाणिस्तानवरच सर्वात जास्त बोली लागलीयय. १००-१ असा डाव लागलाय.. अफगाणिस्तानची टीम ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांग्लादेश आणि स्कॉटलंडसोबत 'ग्रुप ए'मध्ये आहे. यापूर्वी , अॅडलेड ओवलमध्य खेळल्या गेलेल्या एका सराव मॅच दरम्यान भारतानं अफगाणिस्तानला १५३ रन्सनं पछाडलंय.
हा पूर्वानुमान युनिव्हर्सिटी ऑफ केंटरबरीच्या 'इकरम' नावाच्या एका रोबोटनं लावलाय. वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या १४ प्रतिस्पर्धी देशांना झेंडा दाखवल्यानंतर हा अनुमान लावण्यात आलाय. युनिव्हर्सिटीच्या एका एचआयटीलॅब पीएचडी विद्यार्थी असलेल्या एडुअडरे सँडोवलनं रोबोससाठी भविष्यवाणी करणारं सॉफ्टवेइअर तयार केलंय.
न्यूझीलंडच्या एनजेडहेराल्ड़ डॉट को डॉट एनझेडनं दिलेल्या बातमीनुसार, सँडोवलच्या म्हणण्यानुसार, 'ही भविष्यवाणी खरी होईलच अशी नाहीए... क्रिकेटमध्ये बऱ्याचदा निर्णय अनपेक्षितच असतो'... त्यामुळे, आता ही भविष्यवाणी खरी ठरणार किंवा नाही, हे तर येणारा काळच ठरवेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.