15 जणांना अर्जुन पुरस्कर; पण एकही ‘खेलरत्न’ नाही

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रतिभावंत 15 खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार आणि पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कारानं आणि तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. परंतु, यावर्षी कोणत्याही खेळाडूला देशातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.  

Updated: Aug 30, 2014, 06:04 PM IST
15 जणांना अर्जुन पुरस्कर; पण एकही ‘खेलरत्न’ नाही title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रतिभावंत 15 खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार आणि पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कारानं आणि तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. परंतु, यावर्षी कोणत्याही खेळाडूला देशातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.  

हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसंच यावेळी, तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफीही प्रदान केली गेली.  

अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद आणि तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कारांमध्ये ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पाच लाख रुपयांची राशी दिली गेलीय. तर राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारात ट्रॉफी प्रदान केली गेली. अब्दुल कलाम आझाद ट्रॉफीसाठी ट्रॉफीसोबतच दहा लाख रुपये प्रदान करण्यात आले.

निवड समितीनं यंदा कोणत्याही खेळाडूच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी केली नव्हती... त्यामुळे यंदा हा पुरस्कार कुणालाही देण्यात आलेला नाही.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.