मेलबर्न: ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविचनं अँडी मरेचा पराभव केला आहे. या विजयामुळे जोकोविचनं रॉय इमरसनच्या 6 ऑस्ट्रेलियन ओपन टायटलची बरोबरी केली आहे. तर जोकोविचचं हे 11 वं ग्रँड स्लॅम आहे. पण रॉजर फेडररला मागे टाकण्यासाठी अजूनही जोकोविच 7 पावलं दूर आहे. फेडररकडे आता 17 ग्रँड स्लॅम आहेत.
तीन तासांपेक्षा कमी चाललेल्या या मॅचमध्ये जोकोविचनं अँडी मरेचा 6-1, 7-5, 7-6(3) नं पराभव केला. या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच जोकोविच आघाडीवर दिसला. पहिल्याच सेटमध्ये त्यानं मरेला 32 मिनीटांमध्येच मागे टाकलं. पण दुसऱ्या सेटमध्ये मात्र मरेनं कमबॅक करायचा प्रयत्न केला आणि 7-5 नं हा सेट आपल्या नावावर करतं बरोबरी केली.
तर तिसऱ्या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये जोकोविचनं मरेला पुन्हा मागे टाकलं, आणि मेलबर्नच्या मैदानावर इतिहास रचला.