पाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.

Updated: Mar 18, 2016, 11:52 PM IST
पाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार   title=

कोलकाता : भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.

 

भारता आणि पाकिस्तानमध्ये एक्सायटिंग मॅचची अपेक्षा असल्याचं मत पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी व्यक्त केलंय. त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेवर आपण समाधानी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

क्रिकेटच्या रणांगणात जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स उतरतात तेव्हा दोन्ही देशांसाठी एकप्रकारे महायुद्धच असतं. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये टी-20चं महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान यापूर्वी टी-20चा थरार  ५ वेळा रंगला होता आणि त्यात भारताने बाजी मारलेय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतींना एखाद्या युद्धासारखं स्वरुप येतं. क्रिकेटपटूंबरोबरच दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींच्या भावनाही यामध्ये जोडल्या जातात. त्यामुळे या मुकाबल्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांमधील द्वंद्वंही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.