रोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता

आशिया कपमध्ये सलग दोन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यापूर्वी भारताला चिंता सतावतेय ती सलामीवीरांच्या दुखापतीची. 

Updated: Mar 1, 2016, 09:15 AM IST
रोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता title=

मिरपूर : आशिया कपमध्ये सलग दोन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यापूर्वी भारताला चिंता सतावतेय ती सलामीवीरांच्या दुखापतीची. 

भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. ही समस्या टीम इंडियाला सतावतेय.

रोहित शर्मा सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली खेळी केली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. यादरम्यान त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे हे दोन्ही सलामीवीर न खेळल्यास त्यांच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहाव लागेल.