कराचीः पाकिस्तानचा ऑलराउंडर शोएब मलिक आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या फाटल्याची बातमी आल्यानंतर आता शोएब मलिकने पहिल्यांदा यावर समोर येऊन आमचे वैवाहिक जीवन सुखमय असल्याचे आणि दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
'जंग' या वृत्तपत्रांशी बोलताना मलिक म्हणाला, 'आता पण सानिया आणि मी दुबईत एकत्र आहोत. तसेच एकमेंकासोबत जास्तीतजास्त वेळ घालवत आहोत. पण व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असतो. म्हणून त्यामुळे असे समजण्याचे कारण नाही की आमचा विवाह धोक्यात आहे. मलिक पाकिस्तानी आणि भारतीय मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत होते.
पाकिस्तानी मीडियाने हे देखील सांगण्यात आले होते की, मलिक याचे अभिनेत्री हुमैमा मलिक आणि तिच्या कुटुंबासोबत दिसत आहेत.
माझे आणि सानियाचे संबंध मजबूत आहे. लग्नापूर्वीच आम्हांला माहीत होते की हे सहज नाही. आमच्या बाबत चुकीच्या बातम्या ऐकून खूप खराब वाटते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.