शेन वॉर्न पुन्हा वादात, महिलेसोबतचा किसिंगचा फोटो व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न पुन्हा वादात अडकला आहे. शेन वॉर्नचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 

Updated: Jun 19, 2016, 10:15 PM IST
शेन वॉर्न पुन्हा वादात, महिलेसोबतचा किसिंगचा फोटो व्हायरल title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न पुन्हा वादात अडकला आहे. शेन वॉर्नचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शेन वॉर्न एका मुलीबरोबर किसिंग करत आहे. शेन वॉर्नच्या या फोटोबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

शेन वॉर्नच्या आयुष्यामध्ये याआधी एलिजाबेथ हर्ली होती. शेन वॉर्नला तीन मुलं आहेत. यातल्या एकाचं नाव जॅकसन आहे, तो 15 वर्षांचा आहे. वॉर्नबरोबर असलेली ही महिला कोण याबाबत मात्र अजूनही कोणताच खुलासा झालेला नाही.