मुंबई: भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना बाप होणार आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियांका पुढच्या महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार आहे. सुरेश रैनानंच या गोड बातमीला दुजोरा दिला आहे.
सुरेश रैना नुकताच त्याची बायको प्रियांकाला भेटायला हॉलंडला जाऊन आला. रैनाची बायको हॉलंडची रहिवासी आहे. बाळ येणार म्हणून मी हॉलंड आणि दिल्लीच्या माझ्या घरामध्ये बदल केल्याची प्रतिक्रिया रैनानं दिली आहे. मागच्या वर्षी 3 एप्रिलला सुरेश रैना आणि प्रियांकाचं लग्न झालं.