वन डे पाक विरूद्ध बांगलादेशचा विशाल स्कोअर

 सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल आणि विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीमच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरूद्धच्या सिरीजमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये सहा विकेट गमावून ३२९ धावांचा डोंगर उभारला. 

Updated: Apr 17, 2015, 08:20 PM IST
वन डे पाक विरूद्ध बांगलादेशचा विशाल स्कोअर title=

ढाका :  सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल आणि विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीमच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरूद्धच्या सिरीजमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये सहा विकेट गमावून ३२९ धावांचा डोंगर उभारला. 

तमीनने १३५ चेंडूत १५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या तर रहिमने ७७ चेंडूत १०६ धावांची तुफानी खेळी केली. यात १३ चौकारह आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी केली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वन डे मधील आपला सर्वोच्च स्कोअर उभारला. 

यापूर्वी, बांगलादेशची वन डेमध्ये सर्वोच्च धावसंख्या ३२६ होती. ही पाकिस्तान विरूद्धच गेल्या वर्षी मार्चमध्ये ढाकामध्ये केली होती. आजच्या सामन्यात तमीम आणि रहिमने बांगलादेशकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी आहे.  त्यांनी २००६ मध्ये राजिन सालेह आणि हबीबुल बशर यांनी केनिया विरूद्ध १७५ची नाबाद भागीदारी केली होती. 

बांगलादेशकडून सौम्या सरकार (२०) आणि महमुदुल्लाह (५) यांनी लवकर विकेट फेकल्या. पण तमीम आणि रहिम यांनी पाकिस्तानी गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर राहणाऱ्या सईद अजमललाही चांगलेच कुटले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.