सिडनी: सेहवाग, सचिन, रोहित शर्मा यांचे द्विशतकाचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत, ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने मर्यादीत षटकांत त्रिशतक ठोकलं आहे. आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात आतापर्यंत फक्त चार द्वीशतक ठोकले आहेत. ऑस्ट्रेलिया क्लब स्पर्धेत क्वीसलँड वेअर हाऊस क्रिकेट असोसिएशनमध्ये मेटर हिलकडून खेळतांना टुलने हा रेकॉर्ड केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा एक क्लब क्रिकेटर, जेम्सू टुलने क्लब क्रिकेटमध्ये ३४१ रन्स केल्या, यात २५ षटकार आणि ३४ चौकारांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टुलने हा कारनामा ४४ ओव्हरच्या सामन्यात केला.
टुलचा हा रेकॉर्ड तसा विशेष आहे, कारण त्याने खेळलेला क्रिकेटचा हा डाव ४४-४४ षटकांचा होता. टूल हा ४२ व्या षटकात बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरं शतक बनवणं अशक्यच म्हटलं जातं. मात्र जेम्स टुलने ४२ षटकांतच ३४१ धावा ठोकल्या.
बॅटसमॅन जेम्स टुलचा हा डाव ऐतिहासिक आहे, कारण टुलच्या टीमने ४४ षटकांत ४ विकेट ४५७ रन्स केल्या. टुलने डीनसोबत पाचव्या विकेटसाठी २१२ धावांची पार्टनरशीप केली, टुलने आपल्या त्रिशतकी डावासाठी २५ षटकार आणि ३४ चौकार लावले.
सचिन तेंडुलकरने २००० साली इंदूरमध्ये नाबाद २०० रन्स केल्या होत्या, हे वन डे सामन्यातलं पहिलं द्विशतक होतं, भारताच्या वीरेंद्र सेहवागने एका वर्षानंतर हे रेकॉर्ड मोडीत काढलं होतं, सेहवगाने २१९ रन्स केल्या. दोन वर्षानंतर रोहित शर्माने द्विशतक केलं, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात २०१३ मध्ये खेळतांना २०९ रन्स केल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.