वनडेमध्ये क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडला हा विक्रम

वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता मात्र या सामन्यात विविध विक्रमही नोंदवले गेले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात दोनशे धावांची दोनवेळा भागीदारी पाहायला मिळाली. 

Updated: Jan 14, 2016, 02:08 PM IST
 वनडेमध्ये क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडला हा विक्रम title=

पर्थ : वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता मात्र या सामन्यात विविध विक्रमही नोंदवले गेले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात दोनशे धावांची दोनवेळा भागीदारी पाहायला मिळाली. 

 

पहिल्यांदा टीम इंडियाकडून रोहित शर्मा(नाबाद १७१) आणि विराट कोहली(९१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०१७ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१४९) आणि जॉर्ज बेली (११२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या दोनशेहून अधिक धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पाच विकेट राखून पहिला विजय साकारता आला. 

 

या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या दोन संघातील दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे.