टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 13, 2016, 04:58 PM IST
टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट! title=

मुंबई : भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

विराटनं 235 रन्सची विराट खेळी खेळत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटला 'मॅन ऑफ द मॅच' खिताबही प्रदान करण्यात आला. यानंतर विराटला अनेक शुभेच्छा मिळाल्या... यामध्ये एक 'स्पेशल' गिफ्टही विराटला अनपेक्षितरित्या मिळालं. 

स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी टीम इंडियाच्या विजयानंतर ट्विटरवरून टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या... आणि आपलं एक गीतही त्याला गिफ्ट केलं.

'आकाश के उस पार भी' हे गीत लतादीदींनी विराटला भेट केलं. 'टीम इंडियाच्या विजयासाठी आणि विराटला 235 रन्ससाठी खास शुभेच्छा' असं लतादीदींनी ट्विट केलं. सोबत त्यांनी आपल्या गाण्याची यू ट्यूब लिंकही जो़डली होती.