कोहली आयपीएलला मुकण्याची शक्यता

भारताचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या सुरवातीच्या काही मॅचना मुकण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 28, 2017, 06:56 PM IST
कोहली आयपीएलला मुकण्याची शक्यता

धर्मशाला : भारताचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या सुरवातीच्या काही मॅचना मुकण्याची शक्यता आहे. रांचीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टवेळी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे कोहलीला धर्मशालामधल्या चौथ्या टेस्टला मुकावं लागलं.

दुखापतीमधून सावरायला मला आणखी काही आठवडे लागतील असं वक्तव्य विराटनं चौथ्या टेस्टनंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारोहात केलं. पूर्ण तंदुरूस्त झाल्याशिवाय मी मैदानात उतरणार नाही, असं कोहली म्हणाला.  

विराट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमचा कॅप्टन आहे. ५ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलची सुरवातीचीच मॅच बंगळुरू आणि हैदराबादमध्ये आहे.