कोलकाता : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपूर्वी म्हटले होते की त्याला डीआरएसपेक्षाही धोनीवर अधिक विश्वास आहे.
पुणे आणि कटकच्या सामन्यात धोनीचा चाणाक्षपणा पुन्हा पाहायला मिळाला. मात्र कोलकाता वनडेत कोहलीने धोनीला न विचारता डीआरएस घेतला आणि निर्णय भारताविरोधात लागला.
हा प्रसंग घडला २९व्या षटकादरम्यान. ईयॉन मॉर्गन स्ट्राईकवर होता तर बुमराह गोलंदाजी करत होता. यावेळी मॉर्गन बाद झाल्याचे जोरदार अपील भारताकडून करण्यात आले. मात्र अंपायरनी ते अपील फेटाळले.
विराटने धोनीकडे पाहिले आणि डीआरएस घेतला. यादरम्यान धोनी त्याला रोखत होता मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डीआरएसमध्ये मॉर्गन नॉट आऊट ठरला.
Virat decided to take the DRS before listening to Dhoni who was saying no and it was NOT OUT #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/YtgQVUAdUm
— Sai Kishore (@DivingSlip) January 22, 2017