दुबई: टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असल्याची बातमी दुबईमधून आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्ममध्ये आता सेहवाग खेळतांना दिसणार नाही.
Virender Sehwag announces international retirement ahead of joining Masters Champions League. A new league in UAE. pic.twitter.com/701VYiDaHI
— SPORT CONVO (@sportconvo) October 19, 2015
भारताचा धडाकेबाज बॅट्समन असलेल्या वीरूनं सर्वच टीमच्या बॉलर्सच्या नाकी नऊ आणले होते. दुबईमध्ये मास्टर्स चॅम्पियन्स लीगच्या पार्श्वभूमीवर वीरूनं आपली निवृत्ती जाहीर केली. ही लीग रिटायर्ड सीनिअर क्रिकेटपटूंची लीग आहे.
यापूर्वी सोमवारी सकाळीच बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीमची घोषणा केली. यातही वीरेंद्र सेहवागचा समावेश करण्यात आला नाही. मागील बऱ्याच काळापासून वीरूची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झालेली नाही.
वीरेंद्र सेहवागची कारकीर्द
वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकीर्दीत १०४ टेस्ट मॅच खेळत तब्बल ८५८६ रन्स केलेत. त्याचा अॅव्हरेज ४९ होता. त्यानं २३ टेस्ट सेंच्युरी तर ३२ हाफ सेंच्युरी केल्यात. २५१ वनडे मॅचमध्ये ८२७३ रन्स वीरूच्या नावावर आहे. त्यात १५ सेंच्युरी आणि ३८ हाफसेंच्युरींचा समावेश आहे. सेहवागच्या नावावर टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे. सेहवागनं ३१९ रन्सचा हा रेकॉर्ड बनवला जो अजून तरी कुणी तोडू शकलं नाही. तसंच वनडेमध्ये डबल सेंच्युरी करणारा तो भारतीय खेळाडू ठरला. २०११मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्यानं २१९ रन्सची खेळी खेळली होती.
मार्च २०१३मध्ये हैदराबादच्या मैदानात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची टेस्ट मॅच खेळली. तर त्याची अखेरची वनडे पाकिस्तान विरुद्ध कोलकाता इथं २०१३मध्येच झालेली मॅच होती.
काय आहे मास्टर्स चॅम्पियन्स लीग -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.