नेमकं विराटचं चुकलंय तरी काय?

क्रिकेटर विराट कोहली सध्या आपल्या सोशल वेबसाईट ‘ट्विटर’च्या अकाऊंटवर आपल्या मनातल्या भावना शेअर करताना दिसतोय... पण, यामुळे संपूर्ण सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडालीय. 

Updated: Nov 20, 2014, 07:49 PM IST
नेमकं विराटचं चुकलंय तरी काय?  title=

मुंबई : क्रिकेटर विराट कोहली सध्या आपल्या सोशल वेबसाईट ‘ट्विटर’च्या अकाऊंटवर आपल्या मनातल्या भावना शेअर करताना दिसतोय... पण, यामुळे संपूर्ण सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडालीय. 

हे मी काय केलंय? असं विराटचं ट्विट त्याच्या चाहत्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं... नेमकं विराटनं केलंय तरी काय? याबद्दल नेटिझन्स आडाखे बांधू लागले. 

त्यानंतर एक तासांनी आलं विराटचं दुसरं ट्विट ‘मला वाटतंय की आज मी काहीतरी चुकीचं केलंय’. विराटचं हे टविट इंग्रजीमध्ये होतं. यात wrong च्या ऐवजी wrogn असं त्यानं लिहिलं होतं. 

त्यानंतर आलं विराटचं तिसरं ट्विट... ‘इमानदारीत सांगायचं तर मला हे योग्यच वाटलं’ 

त्यानंतर आणखी एक ट्विट… ‘जर मला चांगलं वाटत असेल तर हे चुकीचं कसं होऊ शकेल?’ यातही wrong च्या ऐवजी wrogn असं लिहिलं होतं.   

यानंतर, टविटरवर विराटनं काय केलं असावं याबद्दल #WhatViratDid या हॅशटॅगसहीत चर्चा सुरु झालीय... त्यामध्ये, अनुष्काचंही नाव जोडलं गेलं... मग, मात्र ‘मी नेमकी काय चूक केलीय हे लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे’ असं विराटनं म्हटलंय. 

आता विराटनं नेमकी चूक केलीय तरी काय? त्याच्या या ट्विटचा आणि अनुष्काचा काही संबंध आहे किंवा नाही? हे तर आपल्याला विराटच सांगू शकतो...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.