ब्रिस्बन : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या वन डे सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या करिअरमधील १७ सेंच्युरी करून कमी इनिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
आमलापूर्वी हा रेकॉर्ड विराट कोहली याच्या नावावर होते. त्याने ११२ इनिंगमध्ये १७ वी सेंच्युरी केली होती. पण तीच कामगिरी आमलाने ९८ इनिंगमध्ये करून दाखवली आहे. विशेष म्हणजे विराटने हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाविरुद्धच केले होते.
ऑक्टोबर २०१३मध्ये विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १७ वी सेंच्युरी करून सौरव गांगुलीचा रेकॉर्ड तोडला होता. गांगुलीने १७ सेंच्युरी १७० इनिंगमध्ये पूर्ण केल्या होत्या. या लिस्टमध्ये आमला सर्वात वर पोहचला आहे.
त्याच्यानंतर कोहली (११२ इनिंग), एबी डीव्हिलिअर्स (१५६ इनिंग), सौरव गांगुली (१७० इनिंग) सईद अन्वर (१७७ इनिंग) आणि क्रिस गेल (१८८ इनिंग) यांचा क्रमांक लागतो. आमलाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ११५ चेंडूत १०२ धावा काढल्या. या दरम्यान त्याने ९ चौकार लगावले.
दरम्यान, आमलाची शतकीय खेळी वाया गेली. त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.