कटक : तब्बल तीन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात धमाकेदार शतक झळकावले. ९८ चेंडूमध्ये त्याने दमदार शतकी खेळी साकारली.
या शतकासोबतच वनडेमधील त्याच्या शतकांची संख्या १४वर पोहोचली. शेवटचे शतक त्याने २०११च्या वर्ल्डकपमध्ये झळकावले होते. त्यानंतर तब्बल ५ वर्षाहून अधिक काळाने त्याने पुन्हा शतकी खेळीला गवसणी घातली.
वनडेमधील त्याचे पहिले शतक २००३मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झळकावले होते.
२००३ वि. बांगलादेश (१०२)
२००४ वि. ऑस्ट्रेलिया(१३९)
२००५ वि. वेस्ट इंडिज(११०)
२००५ वि. झिम्बाब्वे(१२०)
२००५ वि. द. आफ्रिका(१०३)
२००६ वि. पाकिस्तान( नाबाद१०७)
२००६ वि. इंग्लंड(१०३)
२००७ वि. ऑस्ट्रेलिया(१२१)
२००८ वि. इंग्लंड(नाबाद १३८)
२००८ वि. इंग्लंड(११८)
२००९ वि. श्रीलंका(११७)
२००९ वि. वेस्ट इंडिज(१३१)
२०११ वि. वेस्ट इंडिज(११३)