www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जपानी कंपनी सोनीने एक्स्पपीरिया मॉ़डेलमधील नवा फोन एक्सपीरिया बाजारात आणला आहे.
हा ड्युयल सिमचा फोन आहे, ज्यात स्नॅड्रॅगन 400 क्वाड कोर प्रोसेसर आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 21 हजार 990 रूपये ठेवण्यात आली आहे.
सोनीने वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये या प्रदर्शित केला होता. आता हा फोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. यातील वापरण्यात आलेलं हार्डवेअर मोटो G मध्ये वापरण्यात आलं आहे.
हा हॅण्डसेट एंड्रायड 4.3 जेली बीन ओएसवर आधारीत आहे. यात 8 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता आहे.
या हॅण्डसेटचा स्क्रीन 408 इंचाचा आहे, रिझॉल्यूशन 960 X 540 पिक्सल आहे. यात दोन कॅमेरे आहेत. याचा रियर कॅमेरा 8 मेगा पिक्सेलचा आहे, तर फ्रंट कॅमेरा हा 8 एमपीचा आहे.
तर फ्रंट कॅमेरा वीजीए रिझॉल्यूशनचा आहे. यातील रियर कॅमेऱ्यात फुल एचडी रेकॉर्डिंग करता येते. या फोनचं वजन 148 ग्रँम आहे, तर हा फोन 8.6 मिमी जाड आहे.
या फोनची बॅटरी 2300 एमएएच आहे, जी 14 तासांचा टॉक टाईम देऊ शकते. या फोनवर 8 तासांपर्यंत व्हिडीओ पाहाता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.