तुमच्या `बिझनेस`साठी मायक्रोसॉफ्टची मदत

तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरुवात करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 16, 2014, 10:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरुवात करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्या या प्रयत्नांना हातभार लावणार आहे जगातील सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी... मायक्रोसॉफ्ट!
आपला व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टनं एक अनोखी मदत योजना जाहीर केलीय. अशा लोकांसाठी कंपनीनं एक टोल फ्री नंबर जाहीर केलाय. या नंबरवर तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मोफत उपलब्ध होणार आहे.
मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुकांना १८००२००२११४ या टोल फ्री नंबरवर `जम्पस्टार्ट` सेवा उपलब्ध होऊ शकेल. या नंबरवर फोन करणाऱ्यांना तज्ज्ञांची एक टीम यशस्वी पद्धतीने व्यापार कसा सुरु करता येईल, त्यासाठी कोणत्या साधनांची आवश्यकता भासू शकते यांबाबत मार्गदर्शन करू शकेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात व्यापारात कोणत्याही टप्प्यावर सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे योग्य मार्गदर्शन... `जम्पस्टार्ट` सुविधेनुसार तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल. यासाठी जम्पस्टार्टच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिलं गेलंय.
`जम्पस्टार्ट`वर येणाऱ्या फोन कॉल्सच्या अनुभवांचा वापर भारतात अगोदरपासून सुरू असलेल्या कंपनीच्या इतर कार्यक्रम उदा. मायक्रोसॉफ्ट वेन्चर्स आणि इंडिया एक्स्लरेटर यांमध्येही करण्यात येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.