www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या फोनमध्ये व्हॉटस् अप, जी टॉक, वी चॅट किंवा आणखी काही चॅटींग अॅप्स असतीलच... पण, हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागते. शिवाय, वाय-फाय, टूजी, थ्रीजी कनेक्शनमध्ये अनेक वेळा रेंज नसल्यानं तुमच्या चॅटींगला ब्रेक लागतो. होय ना... पण, आता मात्र तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकता.
ओपन गार्डन नावाच्या एका टेक टीमनं `फायरचॅट` नावाचं एक अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या ग्रुपचा सीईओ आहे मिचा बेनोलियल. `फायरचॅट`ची खासियत म्हणजे, इंटरनेटशिवाय तुम्ही चॅटींगसाठी ते वापरू शकता. एव्हढंच नाही, तर तुम्ही आऊट ऑफ कव्हरेज एरियामध्ये असाल तरी या अॅपच्या साहाय्यानं तुम्ही तुमचे मॅसेज इतरांपर्यंत पोहचवू शकता आणि या अॅप्लिकेशनचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अगदी मोफत आहे.
`फायरचॅट` अॅप सर्वात अगोदर आयओएस प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलंय. लॉन्च केल्यानंतर या अॅपला तुफान प्रतिसाद मिळालाय. आयओएस प्लॅटफॉर्मवर दर दिवशी जवळजवळ एक लाख डाऊनलोड या अॅपला मिळाले. आत्तापर्यंत ८० देशांमध्ये हे अॅप अत्यंत वेगानं पसरलंय.
काही दिवसांपूर्वी हेच अॅप अँन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टमसाठीही लॉन्च करण्यात आलंय. गुगल प्लेवर मात्र फायरचॅट ४ एप्रिलला लॉन्च केलं गेलंय. गुगल प्लेवर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँन्ड्रॉईड २.२ किंवा त्यावरचं ऑपरेटींग सिस्टम असणं आवश्यक आहे. २.८ एमबीचं हे अॅप आहे.
परंतु, या अॅपची डावी बाजू म्हणजे, हे अॅप केवळ ३०-१०० फूटांच्या दरम्यान काम करतं. म्हणजेच मॅसेज पाठवणारा आणि ज्याला पाठवलाय तो दोघंही १०० फूटांपेक्षा कमी अंतरावर असायला हवेत.
फायरचॅटचं एक इंटरनेट व्हर्जनही उपलब्ध आहे. यामध्ये, तुम्ही कितीही दूरवर असाल तरी तुमच्या मित्रांशी चॅट करू शकता, अशी सुविधाही उपलब्ध आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.