www.24taas.com, नवी दिल्ली
होंडा कार्स इंडिया प्रा. लि.ने सीआर-व्ही या आपल्या स्पोर्ट्स युटिलिटी कारचं नवं मॉडेल बाजारात आणलं आहे. या नव्या सीआर-व्ही मॉडेलची किंमत आधीच्या सीआर-व्ही मॉडेलपेक्षा २.७ लाख रुपयांनी कमी आहे. भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी होंडाने या मॉडेलची किंमत कमी ठेवली आहे.
या सीआर-व्ही कारची दोन मॉडेल्स आहेत. एक मॉडेल २ लीटर पेट्रोल इंजिनवालं असेल, तर दुसरं मॉडेल २.४ लीटर पेट्रोल इंजिनवालं असेल. देशाच्या राजधानीतील शोरूम्समध्ये या कार्ची किंमत १९.९५ लाख रुपये आणि २३.८५ लाख रुपये असेल.
होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष हिरोनोरी कनायामा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलं, की या नव्या सीआर-व्ही मॉडेल्सद्वारे होंडा भारतीय बाजारपेठेत पुन्हा नव्याने प्रवेश करत आहे.
गेली काही वर्षं होंडा आणि त्याची सहाय्यक कंपनी कार विकसित करत आहे. पुढच्या वर्षी काही नवी कार मॉडेल्सही भारतीय बाजारपेठेत उतरवणार असल्याचं कनायामा यांनी सांगितलं. त्यामुळे जगभरात प्रसिद्ध असणारी होंडाची मॉडेल्स भारतीय रस्त्यांवर लवकरच दिसू लागणार आहेत.