www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
सॅमसंगने मोबाईल क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी एक पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. आता गॅलेक्सी टॅब ३ हा नवा मोबाईल लवकरच बाजारात आणणार असल्याची सॅमसंग कंपनीने घोषणा केली आहे.. या टॅबची स्क्रिन ८ आणि १०.१ इंच अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे.
दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने मार्केट काबीज करण्यासाठी सुरूवात केलेय. या नव्या टॅबची किंमत किती असणार, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. मात्र, जून महिन्यापासून जगभरातील सर्व देशांमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध असणार असल्याचे सांगण्यात आलेय.
या नव्या टॅबमध्ये ४.२ ऍण्ड्रॉईड जेली बीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून, यामध्ये वाय-फाय, थ्री जी आणि एलटीई वेरियन्टसही सुविधा असणार आहे. आठ इंच स्क्रिन असलेल्या टॅबमध्ये १.५ गीगाहर्टझ ड्युएल कोअर प्रोसेसर असणार आहे.
तसेच टॅबमध्ये १.५ जीबी रॅम, ५ मेगापिक्सल कॅमेरा आणि १.३ मेगापिक्सल फ्रंटफेसिंग कॅमेरा असेल. सॅमसंगच्या १०.१ इंच स्क्रिन असलेल्या टॅबमध्ये १.६ गीगाहर्टझ ड्युएल कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ३ मेगापिक्सल कॅमेरा आणि १.३ फ्रंटफेसिंग कॅमेरा असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.