मुंबई: माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली माहिती गोपनीय रहावी, यासाठी सगळेच आग्रही असतात. ही माहिती गुप्त रहावी यासाठी पासवर्ड वापरण हा एक सोपा उपाय आहे. पण हा पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी बहुतेकजण सोप्या पासवर्डची निवड करतात, आणि मग हॅकिंगचे धोके निर्माण होतात.
'स्प्लॅशडेटा' या पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीनं 2015 मधील धोकादायक आणि अत्यंत वाईट पासवर्डची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार 1:49 हा मागच्या वर्षातला सगळ्यात वाईट पासवर्ड आहे. तर वाईट पासवर्डपैकी पहिल्या सहा पासवर्डमध्ये '1234', '12345', '123456' या पासवर्डचा समावेश आहे.
तुमचे पासवर्ड एवढे सोपे असतील, तर ते चोरणं हॅकर्ससाठी खूप सोपं असतं, त्यामुळे हे पासवर्ड बदलण्याचा सल्ला स्प्लॅशडेटा या कंपनीनं दिलाय.