www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
फेसबूक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्याचा प्रभाव चांगला पण होतो तसा वाईट ही होतो. ती दुधारी तलवार आहे. अशा दुधारी तलवारीने फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. यातूनच कल्याणमधील एका फेसबुकसॅव्ही तरुणीचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.
सलाम इस्लाम खान या तरुणाने कल्याण येथील तरुणीची फसवणूक केली. त्याने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटचा वापर करत त्याने कल्याणमधील पिडीत तरुणीशी मैत्री केली आणि नंतर तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने नकार देताच त्याने कुटुंबियांना त्रास देण्याची धमकी देत तिला वांद्रे येथे लग्नासाठी येण्यास भाग पाडले. येथे आरोपीचे मित्र राधेश्याम आणि रहमत अली काझी तिला नेण्यास आले होते. आरोपी समोर नसताना त्याच्या नावाने निकाहनामा तयार करण्यात आला आणि कोऱ्या कागदावर तरुणीच्या सह्या घेतल्या गेल्या. मात्र आरोपी तरुणीसमोर आला नाही.
या घटनेच्या तब्बल ८ महिन्यांनंतर आरोपी सलाम खान याने तरुणीचे कल्याण येथून अपहरण केले आणि तिला बनावट निकाहनामा दाखवून तिचा पती असल्याचे जबरदस्तीने मान्य करायला भाग पाडले आणि १० दिवस घरात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले. यात त्याला मित्र फारोज खान याने मदत केली. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.