www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.
मोबाईलवर गाणी ऐकत जात असताना एका तरूणाला धक्का लागला म्हणून १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इंदिरानगर भागातील आरीफ मेहमूद शेख (१७) हा मित्रासोबत रायलादेवी तलाव परिसरात फिरायला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला.
आरीफ मोबाईलवर गाणी ऐकत जात असताना समोरून येणार्या एका मुलाला आरीफचा धक्का लागला. त्यासाठी आरीफने सॉरी म्हटले. परंतु, धक्का लागल्याचा राग आल्याने त्याला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रांना तात्काळ बोलावून घेतले आणि आरीफला जोरदार मारहाण केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.