पुष्काराज परिधान केल्याने काय होतो फायदा...

ग्रहांचा परिणाम हा मानवी मनावर नेहमीच होत असतो. त्यामुळेच ग्रहांचे असणारे खडे याबाबत नेहमीच कुतूहल व्यक्त केलं जातं.

Updated: May 31, 2013, 07:50 AM IST

www.24taas.com
ग्रहांचा परिणाम हा मानवी मनावर नेहमीच होत असतो. त्यामुळेच ग्रहांचे असणारे खडे याबाबत नेहमीच कुतूहल व्यक्त केलं जातं. त्यातीलच एक पुष्कराज हा खडा परिधान केल्याने काय फायदे होतात हे दिसून येते. पुष्कराज सुख व संपत्ती प्रदान करणारा रत्न आहे. पुष्कराज धारण करणार्‍यास सुख, संपत्ती, सौभाग्य यांची कधीच कमी भासत नाही.
विवाह तसेच संततीची इच्छा ठेवणार्‍यांनी पुष्कराज धारण करावी. टीबी, मधुमेह व श्वास विकार असणार्‍यांनी पुष्कराज धारणकेल्याने फायदा होतो. ज्या व्यक्तीचा गुरू ग्रह कमजोर असल्यास त्यांनी पुष्कराज धारण करावा, परंतु त्यासाठी धारण केलेला पुष्कराज हा पूर्णपणे शुध्द असला पाहिजे. पुष्कराज कसा ओळखावा-पुष्कराज ओळखणे अगदी सोपे आहे.
तो पाण्यासारखा असून पारदर्शी, चकाकणारा असतो. त्याची चमक कधीच फिकी पडत नाही. जर पुष्कराजची चमक फिकी पडत असेल तर तो रत्न नकली आहे, असे समजावा. हळदीसारखा पिवळा, केशरी, हिरवा, पांढरा, सोनेरी अशा पाच रंगात पुष्कराज असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.