काँग्रेसला व्हाईटवॉशची भीती, मिझोरमची मतमोजणी सुरू

काँग्रेसची राजकीय इभ्रत राखण्याची अखेरची आशा असलेल्या मिझोरमचा निकाल आज आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवशीस आहे. त्यामुळं त्यांना आज वाढदिवसाची भेट काय मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 9, 2013, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ऐझॉल
काँग्रेसची राजकीय इभ्रत राखण्याची अखेरची आशा असलेल्या मिझोरमचा निकाल आज आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवशीस आहे. त्यामुळं त्यांना आज वाढदिवसाची भेट काय मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मिझोरममध्ये काँगेससमोर आव्हान आहे ते मिझो नॅशनल फ्रंटचं. मिझोरममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. एकूण ४० जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झालीय. मिझोरममध्ये २५ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील १४२ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज निश्चित होईल.
नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दारुण पभाव झाल्यानंतर काँग्रेसचे नेते मिझोरम तरी राखलं जावं याची अपेक्षा करत आहेत. त्यामुळं आता काँग्रेसला व्हाईटवॉश मिळणार की मिझोरम राखण्यात यश... हे लवकरच कळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.