www.24taas.com ,न्यूयॉर्क
असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरांनी सिद्ध केलंय. तसा दावा डॉक्टरांनी केला.
एचआयव्हीची लागण झालेल्या एका लहान मुलीला पूर्णत: बरे करण्यात अमेरिकेतील डॉक्टरांच्या एका पथकाला यश आले आहे. त्यामुळे या असाध्य रोगाच्या लढ्यामधील हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
मिसिसिपी राज्यातील एका दोन वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईकडूनच एचआयव्हीची लागण झाली होती. तिच्या आईलाही एचआयव्हीची लागण झाल्याचे बाळंतपणातच समोर आले. जन्मत:च त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याने डॉक्टलरांनी सुरूवातीपासूनच तिच्यावर औषधोपचार सुरू केले. या उपचारांमुळे एचआयव्हीचीच्या विषाणूंची वाढ रोखली गेली. त्यामुळे बालिकेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू पसरू शकले नाहीत, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अटलांटामध्ये एड्सविषयक परिषद झाली. या परिषदेमध्ये एचआयव्हीसंबंधी औषधोपचारांची माहिती आणि केसपेपर सादर करण्यात आला. एचआयव्हीवर औषधांची मात्रा लागू पडल्याचे या परिषदेत घोषित करण्यात आले. याच धर्तीवर अधिक सखोल औषधोपचार करून लहान मुलांमधील एचआयव्हीचा प्रसार रोखणे शक्यू होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.