www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कुणाला कमीपण दाखवायचा असेल तर ‘जा बांगड्या भर’ असं उपहासानं म्हटलं जातं. पण, याच बांगड्यांमध्ये एखाद्याचा प्रतिकार करायची शक्ती असते, असं मानलं जातं. काय आहे हे नेमकं कारण पाहुयात...
> शारीरिकरीत्या महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त नाजूक असतात. महिलांची हाडेही कमजोर असतात. बांगड्या घालण्यामागे स्त्रियांना शारीरिकरीत्या शक्ती प्रदान करण्याचा मुख्य उद्देश असतो.
> स्त्रियांच्या हातामधील बांगड्यांचा आवाज ऐकताच सर्वांच्या नजरा त्या दिशेकड वळतात. जवळपास सर्व महिला हातामध्ये बांगड्या घालतात. सामान्यतः बांगड्यांना सौभाग्याचे प्रतिक मानलं जातं.
> महिलांचे वय जसेजसे वाढत जाते त्यांना विविध प्रकारचे आजार घेरतात आणि शरीर कमजोर होऊ लागते. सध्याच्या काळात अनेक महिला हातामध्ये बांगड्या घालत नाहीत. यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येत आहे. लवकर थकवा येतो आणि गंभीर आजार सुरु होतात. जुन्या काळातील महिलांना या समस्या नव्हत्या. त्यांचे खानपान आणि नियम-संयम त्यांना निरोगी ठेवत असत, असं मानलं जातं.
> महिलांना शक्ती प्रदान करण्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हातांची हाडे मजबूत करण्यात सोन्या-चांदीच्या बांगड्या महत्त्वाचे काम करतात. या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातांमध्ये सोन्या-चांदीचे गुण सामावले जातात. आयुर्वेदानुसार सोन्या-चांदीचे भस्म शरीराला बळ प्रदान करते. सोन्या-चांदीच्या घर्षणामुळे शरीराला या धातूंचे तत्व प्राप्त होतात.
> याच कारणामुळे जुन्या काळातील महिला दीर्घायुषी आणि निरोगी राहत होत्या. धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते. बांगड्याच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो.
ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील वातावरणामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक वातावरण निर्माण होते.
> ज्या ठिकाणी महिलांच्या हातामधील बांगड्यांचा आवाज येत राहतो त्या ठिकाणी देवी-देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर स्त्रीचे आचरण पूर्णतः धार्मिक असावे. फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.