वृषभ – धैर्याने घ्या

या वर्षात तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमच्या जीवनात पाठिंबा मिळवण्यासाठी एका मजबूत स्तंभाला उभे करावे लागणार आहे. असे झाल्यास तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. ही आनंद आणि समाधान देणारी असणार आहे.

Updated: Jan 4, 2012, 05:55 PM IST

या वर्षात तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमच्या जीवनात पाठिंबा मिळवण्यासाठी एका मजबूत स्तंभाला उभे करावे लागणार आहे. असे झाल्यास तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. ही आनंद आणि समाधान देणारी असणार आहे. तुम्ही प्रवास करणार, शिक्षण घेणार, शिकविणार आणि या बरोबरच कायद्यसंबधी तसेच आध्यात्मिक विषयांत सहभाग घेणार आहात. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींना त्यांच्या वेगानेच चालू द्या. काम आणि संतुलन बनविण्यासाठी तुम्हांला जे काही करायचे आहे. त्यात सुसूत्रता आणा. दूरगामी लाभांसाठी आपण बचत, वित्तीय गुंतवणुकीवर अधिक भर द्या. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा.

बाहेरील कामांचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचा बहुतांशी वेळ हा मित्र आणि परिवारासोबत जाऊ शकतो. या वर्षात काही महिने डोकं शांत ठेवण्याची गरज आहे. २०१२मध्ये ज्या व्यक्ती नवीन व्यवसाय-धंदा सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हे खूप चांगले वर्ष आहे. कष्टाबरोबर काही प्रमाणात क्षण भर विश्रांतीचीही गरज आहे. कोणत्याही नवे संबंध तयार करताना सावधानता बाळगा.

मार्चच्या सुरूवातीला गेल्या वर्षातील खराब काळाला विसरून जाल आणि नव्या उमेदीने नवीने दिशेकडे मार्गक्रमण कराल. रोमान्स आणि मदमस्त आयुष्यात डुबकी मारण्यास तयार राहा. परंतु, सावधानता आणि योग्य निवड ही या नवीन संबंधात महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

वर्षातील दुसऱ्या सहामाहीमध्ये तुमच्याकडे पैशाचा ओघ राहणार आहे. व्यापार आणि कारभारात सौदेबाजी केल्यास ती फायद्याची ठरणार आहे. काही गोष्टी तुम्हाला हव्या होत्या, त्या पैशाच्या माध्यमातून पूर्ण होतील.

व्यवहार आणि व्यावसायिक स्तरावर हे वर्ष समृद्धी आणणारे आहे. याची सुरूवात तिसऱ्या महिन्यापासून होणार आहे. गुरूचे स्थान तुमच्या आयुष्यात एक विस्तीर्ण आकाश निर्माण करणार आहे.

Tags: