2025 मध्ये लग्नाचं प्लॅनिंग करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; वर्षभरात फक्त 75 शुभ मुहूर्त?

Vivah Muhurta :  2025 या वर्षात फक्त लग्नाचे फक्त 75 मुहूर्त आहेत. जाणून घेऊया  कोणत्या तारखांना आहेत हे शुभ मुहूर्त.           

वनिता कांबळे | Updated: Nov 27, 2024, 08:42 PM IST
2025 मध्ये लग्नाचं प्लॅनिंग करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; वर्षभरात फक्त 75 शुभ मुहूर्त?  title=

Vivah Muhurta 2025: 2024 वर्ष संपत आले आहे. यामुळे या वर्षात लग्नाचा बार उडवू न शकरणारे नविन वर्षाची वाट पाहत आहेत. मात्र, 2025 मध्ये लग्नाचं प्लॅनिंग करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. योग्य नियोजन केले नाही तर लग्नासाठी मुहूर्त सापडणार नाही.  नविन वर्षात लग्नाचे फक्त 75 शुभ मुहूर्त आहेत. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान लग्नासाठी एकही चांगला मुहूर्त नाही. यामुळे 2025 या वर्षातील शुभ मुहूर्तांच्या तारखा पाहूनन लग्नाचे नियोजन करा.

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर 

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आणि अविस्मरणीय क्षण असतो. हे संसार रुपी नवं आयुष्य सुरु करताना कोणतेही विघ्न येऊ नसे यासाठी शुभ मुहूर्त पाहूनच लग्न केले जाते. हिंदू धर्मात लग्नाच्या धार्मिक विधीत  मुहूर्त हा अत्यंत महत्वाचा आहे. मुहूर्त पाहूनच लग्नाचा तारीख काढली जाते. मुहूर्तावरच लग्नाच्या सर्व विधी पार पाडल्या जातात. जाणून घेऊया 2025 या वर्षात फक्त लग्नाचे फक्त 75 मुहूर्त आहेत. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही. 2025 वर्षात कोणत्या तारखांना लग्नाचे हे मुहूर्त आहेत. 
जानेवारीमध्ये  10 शुभ दिवस 
16 जानेवारी 2025, गुरुवार
17 जानेवारी 2025, शुक्रवार
18 जानेवारी 2025, शनिवार
19 जानेवारी 2025, रविवार
20 जानेवारी 2025, सोमवार
21 जानेवारी 2025, मंगळवार
23 जानेवारी 2025, गुरुवार
24 जानेवारी 2025, शुक्रवार
26 जानेवारी 2025, रविवार
27 जानेवारी 2025, सोमवार
फेब्रुवारीमध्ये 14 शुभ दिवस 
2 फेब्रुवारी 2025, रविवार
3 फेब्रुवारी 2025, सोमवार
6 फेब्रुवारी 2025, गुरुवार
7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
18 फेब्रुवारी 2025, मंगळवार
19 फेब्रुवारी 2025, बुधवार
21 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
23 फेब्रुवारी 2025, रविवार
25 फेब्रुवारी 2025, मंगळवार

मार्चमध्ये  5 शुभ दिवस
1 मार्च 2025, शनिवार
2 मार्च 2025, रविवार
6 मार्च 2025, गुरुवार
7 मार्च 2025, शुक्रवार
12 मार्च 2025, बुधवार

एप्रिलमध्ये 9 शुभ दिवस 
16 एप्रिल 2025, बुधवार
18 एप्रिल 2025, शुक्रवार
19 एप्रिल 2025, शनिवार
20 एप्रिल 2025, रविवार
21 एप्रिल 2025, सोमवार
25 एप्रिल 2025, शुक्रवार
29 एप्रिल 2025, मंगळवार
30 एप्रिल 2025, बुधवार

मे महिन्यात  15 शुभ दिवस
1 मे 2025, गुरुवार
5 मे 2025, सोमवार
6 मे 2025, मंगळवार
8 मे 2025, गुरुवार
10 मे 2025, शनिवार
14 मे 2025, बुधवार
15 मे 2025, गुरुवार
16 मे 2025, शुक्रवार
17 मे 2025, शनिवार
18 मे 2025, रविवार
22 मे 2025, गुरुवार
23 मे 2025, शुक्रवार
24 मे 2025, शनिवार
27 मे 2025, मंगळवार
28 मे 2025, बुधवार

जूनमध्ये 5 शुभ दिवस
2 जून 2025, सोमवार
4 जून 2025, बुधवार
5 जून 2025, गुरुवार
7 जून 2025, शनिवार
8 जून 2025, रविवार

नोव्हेंबर  14 शुभ दिवस 
2 नोव्हेंबर 2025, रविवार
3 नोव्हेंबर 2025, सोमवार
6 नोव्हेंबर 2025, गुरुवार
8 नोव्हेंबर 2025, शनिवार
12 नोव्हेंबर 2025, बुधवार
13 नोव्हेंबर 2025, गुरुवार
16 नोव्हेंबर 2025, रविवार
17 नोव्हेंबर 2025, सोमवार
18 नोव्हेंबर 2025, मंगळवार
21 नोव्हेंबर 2025, शुक्रवार
22 नोव्हेंबर 2025, शनिवार
23 नोव्हेंबर 2025, रविवार
25 नोव्हेंबर 2025, मंगळवार
30 नोव्हेंबर 2025, रविवार

डिसेंबरमध्ये 3 शुभ दिवस 
4 डिसेंबर 2025, गुरुवार
5 डिसेंबर 2025, शुक्रवार
6 डिसेंबर 2025, शनिवार