महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले.  शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 2, 2025, 11:14 PM IST
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित title=

Maharashtra Kesari 2025 :  सोलापूरचा महेंद्रच कुस्तीतील बाहुबली ठरला आहे. सोलापूरचा महेंद्र गायकवाड  यंदाचा महाराष्ट्र केसरी बनला आहे.  पुण्याच्या पृथ्वीराज मोहाळला चितपट करत महेंद्र गायकवाडने मैदान मारलं आहे.  महेंद्र गायकवाडनं मानाची गदा पटकावली आहे. मात्र,  महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा पहायला मिळाला आहे. अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात सापडली आहे. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

उपांत्य फेरीत शिवराज राक्षे हरल्यानंतर त्यानं पंचांशी वाद घातला. तर महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकांनी पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे गायकवाडच्या समर्थकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. गादी विभागातील कुस्तीच्या निकालानंतर हा गोंधळ सुरू झाला. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ कुस्तीत शिवराजचा पराभव झाल्याचं निकाल दिला. यानंतर कुस्तीपटू शिवराजने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत गोंधळ घातला. शिवराजने थेट पंचाची कॉलर पकडत लाथ मारल्याचा प्रकार घडलाय. यामुळे कुस्तीचं मैदान वादाचा आखाडा बनलं.  अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पंचांनी ठिय्या आंदोलन पुकारलं, शिवराज राक्षेनं लाथ मारल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले होते. अखेर या वादानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत पृथ्वीराज मोहोळ मानाच्या गदेचा मानकरी ठरलाय. अहिल्यानगरमध्ये झालेल्या 67व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली. अखेरच्या काही क्षणांमध्ये महेंद्र गायकवाडला त्यांने चितपट केलंय. विजयानंतर पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.