Raj Thackeray : मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकवले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. महापुरुषांना जातीपातीत अडकवू नका. महाराष्ट्राला जातीपातीच्या संकटातून मुक्त करायला हवं असंही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत पुण्यात तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. विश्व मराठी संमेलनाचा समारोप झाला. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. असं राहिल तरच जग आपल्याला दाद देतात. बाकीची राज्य आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगत असतील तर आपणही अशीच भूमिका घेतली पाहिजे. देशात आजपर्यंत कोणत्याही राज्याचे राज्यगीत नाही. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याचे राज्यगीत आहे. इतिहास म्हणजे भूगोल. कोणीही एखादा भूभाग मिळवल्यानंतर बनतो तो इतिहास. भूगोलाशिवाय इतिहास नाही. प्रगतीच्या नावावर जमीन जात असतील तर त्याला विकास म्हणत नाही. विकासाच्या नावावर जमीनी जाणार असतील तर याला विकास म्हणता येणार नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
इतिहासातून आपण काही घेणार नसलो तर इतिहास न वाचलेला बरा. 370 कलाम काश्मिर मधून रद्द झाले. याचा अर्थ काय? भारतीय माणूस काश्मिर मध्ये घर खरेदी करु शकतो. हे फक्त काश्मिरमध्ये नाही तर हिमाचल प्रदेश, आसाम, मणीपुर येथे जमीन घेऊ शकत नाही. आपणच का मोकळीक दिली आहे. महाराष्ट्रात कुठेच कसे निर्बंध का नाही अस सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सरकारने मराठी भाषे प्रमाणे मराठी माणसाचे देखील अस्तित्व टिकवले पाहिजे. साहित्यीकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. पूर्वी साहित्यीक विविध विषयांसह राजकारणावर देखील आपली मत मांडत होती. आता देखील साहित्यीकांनी राजकारणाविषयी आपली मतं मांडली पाहिजते. तरुणांना वाचनाची गोडी लागली लागली पाहिजे. प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. मराठी भाषेची अस्मिता टिकली पाहिजे. नाही तर या असल्या संमेलनाला काही अर्थ नाही. मराठी भाषा, मराठी पुस्तकांचा प्रचार झाला पाहिजे. महाराष्ट्रतील प्रत्येकाने मराठी भाषेची अस्मिता टिकवली पाहिजे. जाती पातीमधून महाराष्ट्र बाहेर येणे गरजेचे आहे.