भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य, देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती इथेच राहतात; दुसऱ्या क्रमाकांच्या राज्याचे नाव जाणून आश्चर्यचित व्हाल

हुरुन इंडिया रिच लिस्ट  2024 च्या यादीत भारतात 94 नविन अरबपति बनले आहेत. जाणून भारतातील पहिल्या क्रमाकांचे राज्य कोणते जिथे सर्वाधिक श्रीमंत राहतात. 

वनिता कांबळे | Updated: Feb 2, 2025, 06:22 PM IST
भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य, देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती इथेच राहतात; दुसऱ्या क्रमाकांच्या राज्याचे नाव जाणून आश्चर्यचित व्हाल title=

Most Expensive Residential Areas In Mumbai : जगातील श्रीमंताच्या यादीत भारतातील अनेक कुटुंबाना स्थान मिळाले आहे.  हुरुन इंडिया रिच लिस्ट  2024 च्या यादीत भारतात 94 नविन अरबपति बनले आहेत. भारतातील एका राज्यात देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती राहतात. हे भारतातील पहिल्या क्रमांचे राज्य आहे.  तर, उर्वरीत श्रीमंत व्यक्ती जिथे राहतात ते देशातील दुसऱ्या क्रमाकांकाचे राज्य जिथे सर्वाधिक श्रीमंत राहतात. 

महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमाकांचे राज्य आहे जिथे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. दुसऱ्या स्थानवर दिल्ली हे राज्य आहे. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत देखील देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. जगभरातील श्रीमतांच्या यादीत या भारतीयांची नावे आहे. 

हे देखील वाचा... जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो? 

देशाची आर्थिक राजधानी असलेले  मुंबई शहर हे आपल्या महाराष्टरात येते. संपूर्ण जगात मुंबईचा बोलबाला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात राहतात. महाराष्ट्रासह मुंबईत एकूण 386 श्रीमंत कुटुंब राहतात. अब्जाधीशांच्या निवासस्थानाच्या बाबतीत मुंबईने चीनची राजधानी बीजिंगचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.

मुंबई शहरात तब्बल 92 करोडपती राहतात.भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा 27 मजली अँटिलिया हे निवास स्थान , ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निवासस्थान, ब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांसारखे बडे उद्योगपती महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्रा पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. भारतातील 217 श्रीमंत व्यक्ती दिल्लीत राहतात. यामुळेच दिल्ली हे राज्य महाराष्ट्राला टक्कर देत आहे.