16 वर्षीय मुलीने Boyfriend च्या मदतीने स्वत:च्याच घरात...; धक्कादायक CCTV Video समोर

VIDEO Of 16 year Old Girl With Boyfriend: या प्रकरणाचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला असून धक्कादायक घटनाक्रम घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 2, 2025, 02:45 PM IST
16 वर्षीय मुलीने Boyfriend च्या मदतीने स्वत:च्याच घरात...; धक्कादायक CCTV Video समोर title=
व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

VIDEO Of 16 year Old Girl With Boyfriend: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. मात्र अहमदाबादमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणणं कितीपत योग्य आहे असा यावर विचार करावा लागेल. येथील सेला परिसरामधील एका 16 वर्षीय तरुणीने तिच्याच घरातील तिजोरीवर डल्ला मारला आहे. आपल्या प्रिकयकराच्या प्रभावात येऊन या मुलीने स्वत:च्याच घरातील तिजोरी पळवल्याचं घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. हे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या प्रकरणामध्ये मुलीच्या घरच्यांना दोघांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर भोपाळ पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.

तिजोरीत काय काय होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार सेला परिसरातील एका इमारतीमध्ये घडला आहे. 29 सप्टेंबर 2024 रोजी या तरुणीच्या वडिलांनी घरामधील कपाटात एक तिजोरी ठेवली होती. या तिजोरीमध्ये 22 जिवंत काडतुसे (गोळ्या), 12 बोअर गन, बंदुकीचं लायसन्स, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर मौल्यवान वस्तू होत्या. एकूण 1.56 लाखांचा मुद्देमाल या तिजोरीत होता.

घरात तिजोरी नसल्याचं लक्षात आलं

आपल्या स्कुटरचे कागदपत्र शोधत असताना या व्यक्तीला तिच्या घरातील कपाटामध्ये तिजोरी नसल्याचं दिसून आलं. त्याने घरभर तिजोरी शोधली. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या व्यक्तीला धक्काच बसला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीची मुलगी आणि एक तरुण तिजोरी घराबाहेर घेऊन जात असल्याचं दिसलं.

वडिलांनाच मुलाची ओळख पटली

यासंदर्भात वडिलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने नीट उत्तरं दिली नाहीत. त्यानंतर त्या सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या मुलाची ओळख पटली. सीसीटीव्ही फुटेजमधील हा तरुण अहमदाबादमधील बोराडी मील येथे राहणारा ऋतुराज सिंह छावडा असल्याचं मुलीच्या वडिलांच्या लक्षात आलं. मात्र मुलगी वारंवार आपण तिजोरी चोरली नाही असं सांगत होती. आपण दुसरं खोकं घराबाहेर नेलं होतं असं मुलीने सांगितलं. चोरीचे हे सीसीटीव्ही फुटेज तुम्हीच पाहा...

अखेर दिली गुन्ह्याची कबुली

तिजोरीमध्ये गोळ्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं असल्याने वडिलांनी भोपाल पोलिसांकडे तक्रा दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ऋतुराजला अटक करुन त्याचा जबाब नोंदवण्यात आलं. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर ऋतुराजने गुन्हा कबुल केला. आपण 2 वर्षांपूर्वी नवरात्रीमध्ये या मुलीला भेटलो होतो असं ऋतुराजने पोलिसांना सांगितलं. कालांतराने दोघांमधील जवळीक वाढली. ऋतुराजला काही आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे त्याने आपल्या या कथित प्रेयसीला तिच्या घरातील तिजोरीतून चोरी करण्यास भाग पाडलं. 

कुठे टाकलं सामान?

या प्रकरणाचा पोलीस आता सखोल तपास करत असून पैसे वगळता तिजोरीतील इतर सामाना दोघांनी वासना येथील नदी किनाऱ्यावर टाकून दिल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.